१९८६ ते १९९७ : प्रथम नगरसेवक रहाटणी काळेवाडी
१९८६ ते १९८७ : प्रथम अध्यक्ष स्थायी समिती पिं चिं मनपा
२००३ ते २००६ : अध्यक्ष पिं चिं नवनगर विकास प्राधिकरण
२००३ ते २००६ : उपाध्यक्ष संत तुकाराम सहकारी साखर कारखाना
२००६ ते २०१२ : अध्यक्ष केंद्रीय सल्लागार समिती श्रम व रोजगार मंत्रालय
२०१८ ते २०१९ : उपसभापती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग
२०१८ ते २०१९ : अध्यक्ष श्री बाबासाहेब तापकीर एजुकेशन सोसायटी
२०१७ ते २०१८ : अध्यक्षा महिला बालकल्याण समिती
२०१७ ते २०२२ : नगरसेविका पिं चिं मनपा
समाजकारण व राजकारणाचा वारसा लाभलेले रहाटणी-काळेवाडीतील युवा नेतृत्व म्हणजे राज सुनिता हेमंत तापकीर, राज तापकीर यांना समाजसेवा व राजकारणाचे बाळकडू आपले आजोबा श्री बाबासाहेब धोंडीबा तापकीर, वडील श्री हेमंत बाबासाहेब तापकीर व चुलते श्री हरेश बाबासाहेब तापकीर यांच्याकडून मिळाले. त्यांचे आजोबा हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम नगरसेवक, स्थायी समितीचे प्रथम अध्यक्ष व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे प्रथम अध्यक्ष होते.
तर त्यांचे वडील श्री हेमंत बाबासाहेब तापकीर हे केंद्रीय सल्लागार समिती श्रम रोजगार मंत्रालयाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र शासनाच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपसभापती होते. व त्यांचे चुलते हरेश तापकीर हे भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष तर आई सौ. सुनिता हेमंत तापकीर या नगरसेविका व महिला बालकल्याण समितीच्या सभापती होत्या.
पक्षाशी एकनिष्टता व दांडगा जनसंपर्क असल्याने पक्ष श्रेष्टींनी राज तापकीर यांच्यावर मागील काही वर्षे भारतीय जनता पार्टीच्या चिंचवड विधानसभा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची धुरा दिली तसेच त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लावली व सध्या ते पिं चि शहराच्या युवा मोर्च्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.
त्यामुळे समाजसेवा च राजकारण हे राज यांच्या नसानसात भिनले आहे. मागील पाच वर्षात रहाटणी श्रीनगर-तापकीरनगर प्रभागात या आगोदर झाला नव्हता तेवढा विकास त्यांच्या आई माजी नगरसेविका सुनिता तापकीर व त्यांचे सासरे माजी नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते यांनी केला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा रहाटणी चौकात उभारण्यात आला. श्री छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे सुशोभीकरण, प्रभागातील डीपी रस्त्यांचा विकास, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, नव्याने ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या, पेव्हिंग ब्लॉक, एलईडी पथदिवे, काळेवाडी फाटा ते एमएम शाळेपर्यंतचा बीआरटी मार्गावरील अर्बन स्ट्रीट डिझाइन तसेच त्यांच्या संकल्पनेतून फुटपाथ व सायकल ट्रॅक आधुनिक पद्धतीने विकसित केले. आदी कामे त्यांनी प्राधान्याने केली.
घरोघरी कचरा उचलण्यासाठी घंटागाड् यांची संख्या त्यांनी वाढवून घेतली व रस्त्यावर ठिकठिकाणी पडणारे कचऱ्याचे ढीग त्यांनी कमी केले. ही कामे होण्याआधी अनेक कॉलन्यांमध्ये पावसाळ्यात पाण्याचे तळे साचायचे, मात्र, त्यांनी रस्त्यांचे काम करून ही समस्या कायमची मिटवली, करोना महामारीच्या संकट काळात नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून धीर दिला. अशी अनेक कामे व उपक्रम त्यांनी प्रभागात आणले.
नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन नागरिकासाठी अहोरात्र झटणारे राज तापकीर हे नागरिकांच्या घराघरात पोहचले आहेत. आपल्या कुटूंचाचा समाजसेवेचा वारसा पुढे चालविणारे राज तापकीर आता नागरिकांच्या हक्काचे नेतृत्व म्हणून उदयास आले आहे. अनेक तरूणांच्या काळजात राज तापकीर यांनी घर केले असून अनेक तरूणांना स्वयंरोजगाराचे साधन त्यांनी उपलब्ध करून दिले. राज यांच्यावरील प्रेम अनेक तरूणांनी हातावर त्यांच्या प्रतिमेचा व नावाचा टॅटू काढून व्यक्त केले आहे.
राजकारण, समाजकारण याच्या पलीकडे जाऊन राज तापकीर यांचे घोडेस्वारी, प्राणी मित्र व सर्प मित्रासारखे काही पैलू नागरिकांना आश्चर्य व्यक्त करण्यास भाग पाडतात, गाय, बैल, घोडा, मेंढी, कुत्रे आदी प्राण्यांचा त्यांनी सांभाळ केला असून ते घोडस्वारी व साप पकडण्यात निपुन आहेत, असे समाज व प्राण्यांप्रती प्रेम दाखवणारे जनतेच्या मनातले युवा नेतृत्व म्हणजे राज सुनिता हेमंत तापकीर.